प्रकाशाचे परावर्तन

प्रकाश परावर्तनाचे प्रकार

views

5:12
सपाट व खडबडीत पृष्ठभागावर समांतर पडणारे तीन आपाती किरण हे निळ्या रंगात दिसत आहेत. तर परावर्तनाच्या नियमांचा वापर करून आपतन बिंदूवर परावर्तित किरण लाल रंगात दाखविलेले आहेत. आता तुम्ही मला सांगा कोणत्या पृष्ठभागावरील परावर्तित किरण एकमेकाला समांतर आहेत. या आकृतीवरून असा निष्कर्ष काढता येतो की, सपाट पृष्ठभागावर समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. त्यामुळे परावर्तित किरणही परस्परांना समांतर असतात. प्रकाशाचे नियमित परावर्तन आणि प्रकाशाचे अनियमित परावर्तन असे दोन प्रकार आहेत. प्रकाशाचे नियमित परावर्तन: सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास 'नियमित परावर्तन' असे म्हणतात. दाखवल्याप्रमाणे नियमित परावर्तनास समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन व परावर्तन कोन हे सारख्याच मापाचे असतात. त्यामुळे परावर्तित किरण हे परस्परांना समांतर असतात. ज्या प्रमाणे आकृतीत दाखवले आहे. त्यानुसार जर आपाती किरणांचे आपाती कोन i1, i2, i3.......... असे असतील व त्याचे परावर्तन कोन हे क्रमवार r1, r2, r3...... असे असतील जर i1= i2 = i3........... असेल तर r1= r2 = r3 = .............. असेल. मुलांनो हे लक्षात ठेवा की इथे .....(डॅश) म्हणजे याप्रमाणे कितीही आपाती किरण आणि परावर्तन होणारे परावर्तित किरण असू शकतात असा अर्थ आहे.