संख्येचे विस्तारीत रूप.

सरावासाठी काही उदाहरणे

views

3:09
आता आपण सरावासाठी काही उदाहरणे पाहूया. अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिहा. १६ - ६ या अंकाची स्थानिक किंमत ६ आहे, कारण ६ ही संख्या एकक स्थानी आहे. ७७ - ७ या अंकाची स्थानिक किंमत ७० आहे, कारण ७ ही संख्या दशक स्थानी आहे. ४० - ४ या अंकाची स्थानिक किंमत ४० आहे, कारण ४ ही संख्या दशक स्थानी आहे. ५४ - ४ या अंकाची स्थानिक किंमत ४ आहे, कारण ४ ही संख्या एकक स्थानी आहे. मी तुम्हांला काही संख्यांचे विस्तारित रूप दिले आहे. त्यावरून तुम्ही त्या संख्या लिहा. ७०+८ =? सत्तर आणि आठ अठ्ठ्याहत्तर म्हणून चौकटीमध्ये ७८ ही संख्या लिहितो. ९०+७ =? नव्वद आणि सात सत्याण्णव म्हणून चौकटीमध्ये ९७ ही संख्या लिहिली. ६०+१ =? साठ आणि एक एकसष्ट म्हणून चौकटीमध्ये ६१ ही संख्या लिहिली. ८०+० =? ऐंशी आणि शून्य ऐंशी म्हणून चौकटीमध्ये ८० ही संख्या लिहिली. खूपच छान! सर्वांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अगदी बरोबर दिलीत!