वर्षाचे बारा महिने

शाब्दिक उदाहरणे

views

3:53
आता आपण काही शाब्दिक उदाहरणांचा सराव करूया. उदा १) वेदश्रीने पुस्तकाची ९ पाने वाचली. आणखी किती पाने वाचली म्हणजे तिची एकूण १५ पाने वाचून होतील? काय करूया बेरीज की वजाबाकी? वजाबाकी काय दिले आहे? वाचायची एकूण पाने आणि वाचून झालेली पाने. काय विचारले आहे? आणखी किती पाने वाचायची आहेत? इथे वाचायची एकूण पाने आहेत १५ आणि वाचून झालेली एकूण पाने आहेत ९. मग सांगा बरं हे गणित कसे सोडवाल? सर मी वजाबाकी करते. पुस्तकाच्या १५ पानांमधून ९ पाने काढून घेतो आणि बाकीची पाने किती आहेत ते मोजतो ९ गेले म्हणजे उरले ६. म्हणून १५-९= ६. मी पुढे मोजून ९ च्या पुढे १५ पर्यंत मोजतो. त्यावरून मला वजाबाकीचे उत्तर मिळेल. ९च्या पुढे १०,११,१२,१३,१४,१५. ९+६ = १५ झाले. म्हणून १५-९=६. छान!