Active listening

What is Active listening

views

7:03
कधी थोऱ्या-मोठ्यांकडून ऐकलं आहे का? ‘आपल्याला दोन कान व एक तोंड मिळालं आहे. म्हणजे आपण बोलावं कमी व ऐकावं जास्त असा त्याचा अर्थ आहे. आपण नेमकं काय करतो हा वेगळाच मुद्दा आहे. असो. मुळात प्रत्येकालाच खूप काही बोलायचं असतं. ऐकण्यासाठी खूप कमी जण तयार असतात. बोलणाऱ्याला हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे कि, संवाद हा ऐकणारा साधत असतो, बोलणारा नाही. कारण बोलण्यावर जेव्हा प्रतिक्रिया येते, तेव्हा संवाद पूर्ण होतो. मुळात तेच व्यवस्थित ऐकलं गेलं नाही, तर त्यावर योग्य तशी प्रतिक्रिया येणार नाही. योग्य ती प्रतिक्रिया देण्यासाठी मुळात जे बोलले जात आहे ते लक्षपूर्वक ऐकणं गरजेचं आहे. व्यक्तिमत्त्व विकासातील इतर आवश्यक घटकांपैकी लक्षपूर्वक ऐकणं हा देखील एक आवश्यक घटक आहे. याला इंग्रजीत अॅक्टीव्ह लिसनिंग म्हणतात. लक्षपूर्वक ऐकण्याचे कौशल्य हे उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व घडविण्यामध्ये खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असते. शिक्षण असो किंवा नातेसंबंध लक्षपूर्वक ऐकणं हे फायदेशीरच ठरते. मुख्यत्त्वे करियरमध्ये तर हे कौशल्य अत्यंत महत्त्वाचं असते. अर्थात, शालेय जीवनात लक्षपूर्वक ऐकून ज्ञान मिळवल्यास त्याचा उपयोग भविष्यात करियरसाठी होतो. घरात किंवा जवळच्या व्यक्तींसोबत संवाद करताना जर या कौशल्याचा वापर केला, तर नातेसंबंधातील अनेक मर्यादा आणि गैरसमज टाळता येऊ शकतात. शिवाय कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून मिळालेल्या सूचना किंवा आपल्या टीमचे म्हणणे समजून घेण्यासाठी हेच कौशल्य मदत करते.