हरित ऊर्जेच्या दिशेने

अणु- ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जा निर्मिती केंद्र

views

3:55
अणुभंजन केल्यानंतर होणाऱ्या स्फोटात प्रचंड ऊर्जा निर्माण होते. त्याला अणुऊर्जा म्हणतात. अणु ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मितीमध्ये जनित्र फिरवण्यासाठी वाफेवर चालणारे टर्बाइनच वापरले जाते. युरेनियम अथवा प्लुटोनियम सारख्या अणूंच्या अणुकेंद्रकाच्या विखंडनातून उष्णता ऊर्जा निर्माण केली जाते. या उष्णता ऊर्जेचा उपयोग करून पाण्यापासून उच्च तापमानाची व दाबाची वाफ निर्माण केली जाते. अणुतील ऊर्जेचे रूपांतर सर्वप्रथम औष्णिक ऊर्जेत होते. त्यानंतर औष्णिक ऊर्जेचे रूपांतर वाफेच्या गतिज ऊर्जेत व वाफेच्या गतिज ऊर्जेचे रूपांतर टर्बाइनच्या व जनित्राच्या गतिज ऊर्जेत होते. त्यानंतर सर्वात शेवटी जनित्राच्या गतिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते. अशाप्रकारे अणुऊर्जेवर आधारित विद्युत तयार केली जाते. बरं, आता तुम्ही मला अणुविखंडनाची प्रक्रिया कशी होते ते सांगा बरं?