संख्यांचा लहान मोठेपणा

प्रस्तावना

views

3:23
माझ्या हातात या दोन पेन्सिली आहेत. मला सांगा यातील लहान पेन्सिल आणि मोठी पेन्सिल कोणती? डाव्या हातातील पेन्सिल लहान आहे. आणि उजव्या हातातील पेन्सिल मोठी आहे. मग मला सांगा माझ्या हातात एक अखंड आणि एक अर्धा खडू आहे, मग यांमध्ये लहान आणि मोठा खडू कोणता? अखंड असलेला खडू मोठा आहे आणि अर्धा असलेला खडू लहान आहे. आपण वस्तूंचा लहानमोठेपणा पाहिलाना, तसाच आपण संख्यांचा लहान मोठेपणा शिकणार आहोत. चला तर मग करूया सुरवात. एकपासून पुढे वाढत जाणाऱ्या संख्या ह्या मोठ्या असतात. उदा:१ आणि २ या संख्यांपैकी २ ही संख्या मोठी आहे कारण १+१ केले तर २ होतात. म्हणजेच २ ही संख्या १ पेक्षा मोठी आहे.