संख्यांचा लहान मोठेपणा

संख्यांचा विस्तार करून लहान मोठी संख्या ओळखणे

views

4:12
काही उदाहरणांतील संख्यांचा विस्तार करून लहान मोठी संख्या ओळखू. उदा.1) ४३ व २८. ४३ चा विस्तार ४०+३ होतो. आणि २८ चा विस्तार २०+८ होतो. इथे ४० म्हणजे ४ दशक आणि २० म्हणजे २ दशक. ४ दशक २ दशकांपेक्षा मोठे आहेत. म्हणून ४३ ही संख्या २८ पेक्षा मोठी आहे. ४३ > २८. उदा. 2) ३१ व ३३ ३१ चा विस्तार ३०+१ होतो. आणि ३३ चा विस्तार ३०+३ होतो. इथे दोन्ही संख्यांमध्ये दशक स्थानी समान अंक म्हणजे ३ आहे. पण ३३ मध्ये एकक स्थानी ३ आहेत. आणि ३१ मध्ये एकक स्थानी १ आहे. म्हणून ३३ ही संख्या ३१ पेक्षा मोठी आहे. ३१<३३ याचे वाचन ३१ लहान ३३ पेक्षा असे करायचे.