संख्यांचा चढता व उतरता क्रम

संख्यांचा चढता क्रम

views

4:44
याआधी आपण संख्यांचा लहान मोठेपणा कसा ओळखायचा ते पाहिले आहे. आज आपण संख्याचा चढता आणि उतरता क्रम कसा लावायचा ते पाहणार आहोत. चढता क्रम म्हणजे लहान संख्येपासून सुरुवात करून मोठ्या संख्येपर्यंत वाढत जाणाऱ्या संख्यांचा क्रम होय. आणि उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत कमी होत जाणाऱ्या संख्यांचा क्रम होय. उदा. १,२,३,४,५ हा चढता क्रम आहे. तर ५,४,३,२,१ हा उतरता क्रम आहे. आपण ३६,२३,१७ या संख्यांचा चढता क्रम कसा लावला जातो ते पाहू. या तीन संख्यांमध्ये १७ ही संख्या २३ पेक्षाही लहान आहे (१७ < २३) आणि (१७ < ३६) १७ ही संख्या ३६ पेक्षाही लहान आहे. म्हणजे १७ ही सर्वात लहान संख्या आहे. म्हणून आपण पहिली रेघ १७ वर मारु आणि ती संख्या फळ्यावर लिहू. आता २३ आणि ३६ या दोन संख्या उरल्या आहेत. २३ आणि ३६ या संख्यांमध्ये २३ ही संख्या ३६ पेक्षा लहान आहे. म्हणून दुसरी रेघ २३ वर मारू आणि ती संख्या फळ्यावर १७ च्या नंतर लिहू. शेवटी एकच संख्या राहते ती म्हणजे ३६. म्हणून आता ३६ वर रेघ मारू आणि ती संख्या फळ्यावर २३ च्या नंतर लिहू. हा पहा झाला आपल्या संख्यांचा चढता क्रम तयार. तो आपण पुढीलप्रमाणे लिहू: १७ < २३ < ३६.