संख्यांचा चढता व उतरता क्रम Go Back संख्यांचा उतरता क्रम views 4:06 आता आपण संख्यांचा उतरता क्रम कसा लावायचा ते पाहणार आहोत. पहा, ३६, २३ आणि ४८ या तीन संख्या दिल्या आहेत. यांचे नीट निरीक्षण करा आणि सांगा यात सर्वात मोठी संख्या कोणती आहे? ४८ आहे. ४८ ही संख्या ३६ आणि २३ या दोघींपेक्षा मोठी आहे. म्हणून प्रथम तिच्यावर रेघ मारू आणि ती फळ्यावर लिहू. आता उरलेल्या दोन संख्यापैकी कोणती संख्या मोठी आहे? ३६ बरोबर! ३६ ही संख्या २३ पेक्षा मोठी आहे. म्हणून आता ३६ वर रेघ मारू. आणि ती फळ्यावर लिहू. शेवटची राहिलेली लहान संख्या म्हणजे 23 आहे. तिच्यावर रेघ मारून ती फळ्यावर लिहू. अशाप्रकारे हा झाला आपला उतरता क्रम तो आपण असा लिहू: ४८ > ३६ > २३. ज्याप्रमाणे आपण चढत्या क्रमात लहान संख्यांपासून मोठ्या संख्यांवर रेघ मारली होती त्याचप्रमाणे उतरत्या क्रमात मोठ्या संख्येपासून सुरुवात करून लहान संख्ये पर्यंत रेघ मारायची. संख्यांचा चढता क्रम संख्यांचा उतरता क्रम