खास बेरीज हातच्याची

दोन अंकी संख्यांची बिनाहातच्याची बेरीज

views

4:25
आतापर्यंत आपण एक अंकी संख्यांची बेरीज कशी करायची ते पाहिले आता आपण दोन अंकी संख्यांची बिनाहातच्याची बेरीज कशी करायची ते पाहू. उदाहरण: २० + १६ = ? पहा शून्य एककात ६ एकक मिळवले तर उत्तर ६ एककच येणार. आणि इथे २ दशकात १ दशक मिळवला तर उत्तर ३ दशक येणार. म्हणजे २० + १६ = ३६ झाले. १३ + ४० = ? हे गणितही पहिल्या गणितासारखेच आहे. तीन एककात शून्य एकक मिळवले तर ३ एकक झाले. आणि १ दशकात ४ दशक मिळवले तर ५ दशक झाले. म्हणजे १३ + ४० = ५३ झाले. बिनाहातच्याची गणिते करणे सोपे असते. म्हणून आता आपण थोडी कठीण गणिते सोडवू. म्हणजे दोन अंकी हातचाची गणिते सोडवू. त्यासाठी हे पाहिले उदाहरण पहा: १५ + ९ = ? हे गणित प्रथम उभ्या मांडणीत लिहू. पहा इथे १५ मध्ये ५ एकक आणि १ दशक आहे. आणि ९ मध्ये केवळ ९ एककच आहेत. हे गणित आपण मण्यांच्या साहाय्याने सोडवू. १५ मण्यांपैकी १० ची एक माळ तयार होऊन ५ मणी सुट्टे राहिले. आणि हे ९ मणी सुट्टे आहेत. म्हणून प्रथम एककांची बेरीज करू. ५ एकक आणि ९ एकक मिळून १४ एकक झाले. या १४ मण्यांपैकी १० मण्यांची १ माळ तयार करू. ही एक माळ म्हणजेच दशक किंवा हातचा आहे. त्याला दशकाच्या घरात ठेऊ. आणि उरलेले ५ एककाच्या घरात उत्तरात लिहू. आता दशकाच्या घरात अगोदरचा १ दशक आणि नवीन आलेला १ दशक मिळून २ दशक झाले. ते उत्तरात लिहू. म्हणजे १५ + ९ = २४ झाले.