गोष्टीतील बेरीज

सोपी बेरीज दशक वाढवून किंवा कमी करून

views

4:31
आता पर्यंत आपण दशक आणि एककाची गणिते सोडवली. आता आपण दशकामध्ये दशक कसा मिळवायचा किंवा कमी करायचा ते काही उदाहरणातून समजून घेऊ. उदाहरण: ४१ + १०. हे पाहा, इथे ४ दशक आणि १ एकक आहे. त्यामध्ये आपल्याला अजून १ दशक मिळवायचा आहे मग तो कसा मिळवणार? १ दशक म्हणजे १० म्हणून ४ दशक म्हणजे ४० झाले. ४ दशक आणि १ एकक मिळून ४१ झाले. आता आपल्याल त्यात १ दशक मिळवायचा आहे. आणि १ दशक म्हणजे १० मिळवायचे आहेत. आता आपण ते मिळवू. पूर्वीचे ४ दशक होते. त्यात आणखी एक दशक मिळवला तर एकूण ५ दशक झाले. एककात मिळवण्यासाठी काहीच नाही. म्हणून तो तसाच राहील. म्हणून आपले गणित तयार होईल ४१ + १० = ५१. उदाहरण: ४१ - १० इथे पाहिले ४ दशक होते. म्हणजे ४० होते. त्यातून १ दशक म्हणजे १० कमी करायचे आहेत. ४ दशकातून १ दशक कमी केला म्हणजे राहिले ३ दशक. आणि एककातील १ तसाच राहिला. म्हणजे आपले गणित तयार होईल ४१ - १० = ३१.