वजाबाकी साठी दशक सुटा करू

वजाबाकी : दशक सुटा करून

views

4:27
आता तुम्हांला दशक कसा सुटा करायचे ते कळले आहे. तर यावर आधारित आपण काही गणिते सोडवू. उदा.१): २२ – ७ = ? इथे आपल्याला २२ मधून ७ वजा करायचे आहेत. २२ मध्ये २ दशक आणि २ एकक आहेत. २ एककातून ७ एकक जातील का? मग काय करावे लागेल? २ दशकातील १ दशक मोकळा करावा लागेल. बरोबर! १ दशक मोकळा केला तर आता किती एकक होतील आणि दशक किती राहतील? १० आणि २ मिळून १२ एकक होतील आणि २ दशकातून १ दशक मोकळा केला ते १ च दशक शिल्लक राहील. मग आता १२ एक्कातून ७ एकक वजा करता येतील का? हो बाई १२ मधून ७ एकक वजा केले तर ५ एकक शिल्लक राहतील. शि: बरोबर दशकात आता १ च शिल्लक राहिला तो तसाच उत्तरात लिहू. म्हणजे २२ – ७ = १५. शाब्बास! अगदी बरोबर गणित सोडवलास. असाच गणितांचा सराव तुम्ही तुमच्या घरी करा.