लांबी मोजुया

लांबी मोजणे

views

3:07
आज आपण दोन वस्तूंमधील अंतर मोजायचे असल्यास ते कसे मोजणार ते पाहू. मुलानो. हा आपल्या वर्गातील दरवाजा आहे. आणि हा फळा आहे. त्यामधील अंतर किती आहे हे मला समजून घ्यायचे आहे. हे अंतर मी पट्टीच्या साहाय्याने किंवा दोरीच्या साहाय्याने मोजेन. याचप्रमाणे तु हाताच्या वितीने किंवा पायाच्या पावलांनीही हे अंतर मोजू शकतो. आता हे पहा चित्र या चित्रामध्ये एक कपाट दाखवले आहे. आणि समोर दरवाजा आहे. आणि या दोघांमध्ये रिकामी जागा आहे. या रिकाम्या जागेत यशला त्याचा अभ्यासाचा टेबल बसवायचा आहे. म्हणून त्याने त्या जागेची लांबी काठीच्या साहाय्याने मोजली. तर ती ४ काठ्या आणि त्यापेक्षा थोडी जास्त भरली. आता हीच काठी घेऊन तो बाजारात टेबल आणण्यासाठी गेला. तर तिथे दुकानात अशी वेगवेगळ्या आकारांची टेबले होती. कोणाचे माप २ काठ्या होतील इतके होते, कोणाचे ३ काठ्यांइतके, कोणाचे ४ काठ्यांइतके तर कोणाचे ५ काठ्यांइतके होते. आपल्या वर्गाच्या दरवाजाला तोरण लावायचे आहे. आणि त्यासाठी आपल्याला फुलांचे हार बनवावे लागतील. रमा इकडे ये. आणि तुझ्या हाताच्या वितीने मोज हे दरवाजाचे आंतर किती आहे ते. पाहा रामाच्या हाताच्या १० वितींएवढे दरवाजाचे अंतर आहे. पण मी हा दोरा हार बनवण्यासाठी रामाच्या २ विटी जास्त म्हणजे १२ विटी असलेला दोरा कापून घेते आहे. सांगा बर अस मी का करते आहे? नाही माहित बर मीच सांगते. पाहा दरवाजाचे अंतर १० वीत आहे. आणि जर मी तेवढाच दोरा घेतला तर मला हा हार खिळ्याला बांधायला जागाच उरणार नाही. म्हणून हार करताना १ वीत जागा सुरवातीला आणि १ वीत जागा शेवटी सोडून हार तयार करेन. म्हणजे हा उरलेला दोरा गाठ बांधण्यासाठी उपयोगी होईल.