आकृतिबंध

आकृतिबंध

views

3:58
आपण आकृतिबंध म्हणजे काय ते समजून घेऊ. एकाच प्रकारच्या आकृत्या, आकार, नक्षी, अंक, अक्षरे पुन्हा पुन्हा त्याच क्रमाने येणे म्हणजे आकृतीबंध होय. यामध्ये पहिला चार पाने दाखवली आहेत आणि नंतर ३ पाने दाखवली आहेत. पुन्हा ४ पाने नंतर ३ पाने. हाच क्रम शेवट पर्यंत आहे. तसेच ही दुसरी आकृती पाहा, यामध्ये पहिला काळा चौकोन नंतर पांढरा चौकोन. पुन्हा काळा चौकोन नंतर पांढरा चौकोन असा क्रम आहे. नंतर दुसऱ्या रांगेत प्रथम पांढरा आणि नंतर काळा असा क्रम आहे. यामध्ये १,३,५,७ या विषम संख्यांच्या रांगेत असणारा क्रम सारखा आहे. तर २,४,६,८ या सम संख्यांच्या रांगेत असणारा क्रम सारखा आहे. या तिसऱ्या चित्रात एका गेटचे चित्र दाखवले आहे. यात असणारा आकृतिबंध सारखाच आहे. तसेच या चौथ्या चित्रात एका किल्ल्याची भिंत दाखवली आहे. त्यावरील नक्षीकाम सारखेच आहे. आणि या शेवटच्या चित्रात नक्षी दाखवली आहे. या नक्षीमधील सर्व आकार सारखेच आहेत.