प्रोग्रामिंग लँग्वेज ची ओळख

फ्लोचार्ट

views

4:28
याआधी आपण प्रोग्रामिंगच्या काही प्रक्रिया शब्दांमध्ये मांडून पहिल्या. या प्रक्रिया आपण शब्दांत आणि आराखडा काढूनही मांडू शकतो. आराखडा काढून मांडलेल्या प्रक्रिया समजायला सोप्या जातात. आणि सादर करताना प्रभावी वाटतात. आराखडा काढून त्यात शब्दांची मदत घेऊन प्रक्रिया मांडल्यावर जो तक्ता तयार होतो, त्याला फ्लो चार्ट असे म्हणतात. फ्लो चार्टमध्ये काढलेल्या आराखड्यातून प्रक्रियांचा अनुक्रम व्यवस्थित मांडता येतो.