Coding (Graphical Coding - Scratch and Snap)

Importance of Language

views

2:05
आपल्याला दुसऱ्या कोणाला काही सांगायचे असेल तर त्यासाठी भाषेचा उपयोग करावा लागतो. भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. जगभरात त्यापेक्षा आणखी वेगळ्या भाषा बोलल्या जातात. जर एकमेकांची भाषा कळत नसेल तर खाणाखुणांची भाषा लोक वापरतात. काही वेळा सांकेतिक भाषेचा उपयोग ही केला जातो. रस्त्यावरच्या सिग्नलमध्ये लाल माणूस दिसला कि चालणाऱ्याने थांबायचे आणि वाहनांना जाऊ द्यायचे हे समजते. ही पण एक सांकेतिक भाषा आहे. माणसा-माणसांतील संवादासाठी या सर्व भाषा उपयोगी पडतात.