कोन

कंपास आणि पट्टीच्या साहाय्याने काढणे

views

5:08
दिलेल्या कोनाच्या मापाएवढे माप असणारा कोन, कंपास आणि पट्टीच्या साहाय्याने काढणे. आता या आकृतीमध्ये आपल्याला कोन ABC दिला आहे. आणि यावरून आपल्याला तेवढ्याच मापाचा कोन PQR काढायचा आहे. हा कोन काढण्यासाठी प्रथम किरण QR काढा. नंतर कंपासमध्ये सोईस्कर अंतर घ्या. आता कंपासचे टोक कोन ABCच्या बिंदू B वर ठेवा. आणि किरण BA व किरण BC यांना छेद्णारा कंस काढा. या छेदनबिंदूला D व C अशी नावे द्या. नंतर कंपासमधले अंतर कायम ठेवून कंपासचे लोखंडी टोक किरण QR च्या बिंदू Q वर ठेवून एक कंस काढा. आता कंस रेषा QR ला ज्या बिंदूत छेदते, त्या बिंदूला T नाव द्या . यानंतर कंपासचे टोक कोन ABC मधील E या बिंदूवर ठेवून कंपासमधील पेन्सिलचे टोक D वर पडेल इतके अंतर घ्या. कंपासमधील अंतर न बदलता आता कंपासचे टोक बिंदू T वर ठेवा आणि अगोदर काढलेल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढा. दोन्ही कंसांच्या छेदबिंदूस S हे नाव द्या. आता किरण QS काढा आणि या किरणावर P बिंदू घ्या. अशा प्रकारे कोनPQR हा तयार झाला आणि त्याचे माप कोनABC एवढेच आहे..