प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह Go Back प्रस्तावना views 3:34 वैदिक काळामध्ये यज्ञविधीला अतिशय महत्त्व प्राप्त झाले होते. यज्ञ विधी करण्याचे हक्क फक्त पुरोहित वर्गालाच होते. त्यामुळे त्या वर्गाला अधिक महत्त्व प्राप्त झाले होते. माणसाच्या कर्तुत्वापेक्षा त्याचा जन्म कोणत्या वर्णामध्ये झाला आहे याला जास्त महत्त्व दिले जाई.ब्राहमण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे चार वर्ण होते. हे ब्राहमण म्हणजेच पुरोहित त्यांचे काम काय होते? तर देवपूजा करणे... म्हणजेच धर्मविधी करणे, यज्ञ विधी करणे. वर्णव्यवस्था आधी लवचीक होती. वर्ण कामानुसार ठरत असत. पण पुढे ते जन्माने ठरू लागले. वर्णव्यवस्थेचे निर्बंध हळूहळू कठोर होत गेले. यज्ञविधीतील साधेपणा नाहीसा झाला आणि त्यातील कर्मकांडांना, तपशीलांना फार महत्त्व आले. इतके की ते सर्वसामान्य माणसांना समजायला अवघड झाले. त्यामुळे पुढे उपनिषदांच्या काळात धर्माचा विचार फक्त यज्ञापुरताच ठेवू नये, तो अधिक विशाल असावा असे प्रयत्न सुरु झाले. पण त्या काळातील विद्वानांनी आत्म्याचे ज्ञान, आत्म्याचे स्वरूप अशा गोष्टींवर खूप जोर दिला. हेही सर्व सामान्यांना समजायला अवघडच होते. म्हणून मग वेगवेगळ्या देवतांच्या उपासनेवर भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले. डोळ्यांना दिसणारी देवाची मूर्ती सामान्य लोकांना आपलीशी वाटते. तिची पूजा करणे, प्रार्थना करणे यात त्यांना आधार मिळतो. म्हणून शिवभक्तांचा शैवपंथ, विष्णुभक्तांचा वैष्णव पंथ असे संप्रदाय निर्माण झाले. या देवतांच्या कथा, वर्णन करणारी पुराणे निर्माण झाली. प्रस्तावना जैन धर्म पंचमहाव्रते बौद्ध धर्म आर्यसत्ये अष्टांगिक मार्ग ज्यू धर्म पारशी धर्म