आपले समाजजीवन Go Back माणसातील समाजशीलता views 4:14 मानव हा समाजशील किंवा समाजप्रिय प्राणी आहे . सर्वांबरोबर राहणे जशी आनंददायी गोष्ट आहे तसेच ती आपली गरजही आहे. तसेच आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला समाजाची व समाजातील विविध लोकांची गरज असते. आपल्या अनेक गरजा आहेत. अन्न वस्त्र निवारा या सर्व आपल्या शारीरिक गरजा आहेत. या शारीरिक गरजा पूर्ण झाल्या तर आपले जीवन स्थिर होते. पण जशा या शारीरिक गरजा आहेत त्याचप्रमाणे माणसाच्या मानसिक गरजाही असतात. आपण आनंदी असलो की तो आनंद आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगावासा वाटतो. किंवा आपल्या दु:खाच्या प्रसंगी कोणीतरी आपल्या सोबत असावे असे वाटते. त्यांच्या सोबत आपल्याला सुरक्षित वाटते . आपल्या लोकांचा आणि कुटुंबाचा सहवास आपल्याला सुखातही आणि दु:खातही हवाहवासा वाटतो , यावरून आपण समाजप्रिय आहोत हे दिसून येते .समाजामध्ये अनेक व्यक्ती असतात. त्यांच्या श्रम कौशल्यामुळे नवीन- नवीन वस्तू तयार होतात. यातून नवीण उद्योग किंवा व्यवसाय सुरु होतात. आणि याच उद्योग व व्यवसायातून आपल्या गरजा पूर्ण होतात. माणसाला समाजाची गरज का वाटली माणसातील समाजशीलता आपला विकास समाज म्हणजे काय?