जिल्हा प्रशासन

प्रशासनातील पॅटर्न

views

2:32
महाराष्ट्रातील प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी कामांच्या पद्धतीत बदल घडवून आणले. त्यामुळे लोकांचा प्रशासनावर विश्वास बसला आणि त्यांचा सहभागही वाढला. याच काही पॅटर्न ची माहिती आपण आता पाहू.१) लाखीना पॅटर्न : अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. अनिलकुमार लाखीना यांनी नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, प्रशासनाने काम चांगले करावे याकरिता प्रशासनात अनेक सुधारणा घडवून आणल्या. म्हणजेच कार्यपद्धतीत प्रमाणबद्धता आणली, लोकांना नियम सहज समजतील अशा सोप्या भाषेत तयार केले. याच सुधारणा लाखीना पॅटर्न म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रात 1980च्या दशकात 'लखीना पॅटर्न' नावाने गाजलेल्या प्रयोगात अनिलकुमार लखीना यांनी अभिलेख व्यवस्थापनाची आदर्श पध्दत घालून दिली होती आणि 'कोणतेही कागदपत्र मागा, तीस सेकंदात काढून देतो' अशी घोषणाही केली होती.२) दळवी पॅटर्न : पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. चंद्रकांत दळवी यांनी केलेल्या प्रशासन सुधारणांना दळवी पॅटर्न असे म्हणतात. दळवी यांच्याकडे जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार असताना त्यांच्या कार्यालयाने एक नोव्हेंबर 2008 ते 31 डिसेंबर 2010 या काळात 20 वर्षांपासून प्रलंबित असलेली 23 लाख 46 हजार प्रकरणे निकाली काढली. वर्षानुवर्षे टेबलावर पडलेल्या फाईली साठवून न ठेवता त्यांचा त्याच दिवशी निर्णय घेणे आणि कामामध्ये गतिमानता आणणे हे या सुधारणेचे उद्दिष्ट होते. ३) चहांदे पॅटर्न: नाशिक मधील विभागीय आयुक्त डॉ. संजय चहांदे यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणांना चहांदे पॅटर्न म्हणून ओळखले जाते. सामान्य जनतेचा प्रशासनात सहभाग वाढावा यासाठी त्यांनी ग्रामस्थ दिन योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी एका ठरलेल्या दिवशी गावात जाऊन तेथील लोकांशी थेट संवाद साधावा आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करावे असा उपक्रम राबवला.