पृथ्विगोल, नकाशा तुलना क्षेत्रभेट Go Back पृथ्वीगोल व नकाशा तुलना views 3:25 आपण पृथ्वीगोल आणि नकाशा यातील फरक शिकणार आहोत. नकाशा हे साधन सपाट असते. पृथ्वीचा गोल हे गोलाकार साधन आहे. नकाशा या साधनामुळे पृथ्वीचे पूर्ण क्षेत्र आपण एकाच वेळी पाहू शकतो. तर पृथ्वीगोल या साधनामुळे पृथ्वीची एकच बाजू एका वेळी पाहता येते. नकाशा हे साधन राज्याची, देशांची माहिती सांगते. विशिष्ट प्रदेशाचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी नकाशाचा वापर केला जातो. पृथ्वीगोलावर संपूर्ण जग दिसत असल्याने त्यात छोट्या प्रदेशाचे तपशील दाखवता येत नाहीत. याउलट नकाशा जगाचा काढता येतो, तसाच एका देशाचा, एका राज्याचा, इतकेच काय एका जिल्ह्याचा, एका गावाचाही बनवता येतो. नकाशामध्ये राजकीय विभाग जसे दाखवता येतात, तसेच प्राकृतिक विभागही दाखवता येतात. उदा. पर्वतीय प्रदेश, पठारे, किनारपट्टी, मैदानी प्रदेश, वाळवंट इत्यादी. देशातील नद्यांचा नकाशाही बनवता येतो. तसेच देशातील रेल्वेमार्गाचे जाळे दाखवणारा नकाशाही असतो. देशामध्ये कोणती पिके कोठे होतात, कोणती खनिजे कोठे मिळतात हेही नकाशांच्या मदतीने समजून घेता येते.म्हणजेच प्रदेशाचा तपशीलवार अभ्यास करायचा असल्यास पृथ्वीगोलापेक्षा नकाशेच अधिक उपयुक्त ठरतात. पृथ्वीचा गोल ही पृथ्वीची प्रतिकृति म्हणता येईल. नकाशे हे द्विमितीय असतात, तर पृथ्वीगोल हे त्रिमितीय अ सतात. लांबी व रुंदी अशा दोन मिति असलेली वस्तू म्हणजे द्विमितीय वस्तू होय. लांबी व रुंदी मिळून द्विमितीय वस्तूचे क्षेत्रफळ तयार होते. पृथ्वीगोल व नकाशा तुलना भौगोलिक सहल , भूगोल दालन – अर्था