महासागरांचे महत्त्व Go Back महासागराचे मानवी जीवनातील महत्त्व-भाग १ views 4:07 मीठ व मिठागरे :- मानवी जीवनात अन्नपदार्थांमध्ये मीठ हा महत्त्वाचा घटक आहे. कोणत्याही अन्नपदार्थाला चव प्राप्त होण्यासाठी किंवा अन्न चविष्ट स्वादिष्ट होण्यासाठी मीठ खूप महत्त्वाचे असते. आणि असे हे मीठ खाऱ्या पाण्यापासून आपल्याला मिळते. मीठ हा पदार्थ समुद्रकिनारी भागात मिठागरे तयार करुन मिळवला जातो. मीठ तयार करण्याच्या पूर्ण प्रक्रियेला १० ते १५ दिवस लागतात. मुंबई मध्ये मुलुंड व भाईंदर याठिकाणी मिठागरे आढळतात. १) मिठागरातील जमीन ठोकूनठोकून कठीण केली असल्याने त्यात पाणी मुरत नाही. बांध घालून त्यात समुद्राचे पाणी अडवले जाते. सूर्याच्या उष्णतेने पाण्याचे बाष्पीभवन होते. आणि पाण्यातील मीठ खाली शिल्लक राहते. हे मीठ अशुद्ध असते कारण त्यात माती मिसळलेली असते. त्यावर प्रक्रिया करून ते स्वच्छ केले जाते.खानिजे:- मानवी जीवनाची प्रगती तसेच देशाची प्रगती खानिजांवर अवलंबून असते. ती खानिजे सुद्धा आपल्याला महासागरातुन मिळतात. उदा.- फॉस्फेट, सल्फेट, आयोडीन इ. अनेक खानिजे समुद्रात असतात. त्यामुळे खानिजांसाठी आपण काही प्रमाणात महासागरावर अवलंबून असतो. म्हणजेच खानिजांच्या दृष्टीने महासागर महत्त्वाचे आहेत हे दिसून येते.२) सागराच्या पाण्यात मीठ, ब्रोमीन, मॅग्नेशियम यांचे उत्पादन तर होतेच, पण या सागराच्या तळाशी मँगॅनीजचे साठे गाठींच्या स्वरूपात आढळतात.3)मासे व इतर जीव : मासे हा पदार्थ अनेकजण आपल्या आहारामध्ये खातात. हे मासे आपल्याला नदी, तलाव, महासागर यांतून मिळतात. नदी, तलाव यांच्यापेक्षा महासागरातून मिळणाऱ्या माशांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे समुद्रकिनारी मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. म्हणून मासेमारी हा मानवाच्या प्राचीन व्यवसायांपैकी एक व्यवसाय आहे. माशांचा उपयोग आहारासाठी केला जात असला तरी इतर व्यवसायांमध्येही त्यांचा वापर केला जातो. उदा. औषधनिर्मिती, ख़तनिर्मिती व संशोधन इत्यादी. कॉडलिव्हर हे तेल माश्यापासून मिळते. ड जीवनसत्त्वासाठी त्याचा औषध म्हणून उपयोग होतो. भारतामध्ये प्रामुख्याने शिंपले, कोळंबी, खेकडे, सुरमई, बांगडा, पापलेट, रावस इत्यादी समुद्रजीव आहारात खाल्ले जातात. जलावरणाचे घटक, जलावरणातील सजीवसृष्टी पाण्याची क्षारता महासागराचे मानवी जीवनातील महत्त्व-भाग १ महासागराचे मानवी जीवनातील महत्त्व-भाग 2 महासागराचे मानवी जीवनातील महत्त्व-भाग 3 महासागराच्या समस्या