खडक व खडकांचे प्रकार Go Back गाळाचे खडक/ स्तरित खडक/ थरांचे खडक/ जलजन्य views 3:44 गाळाच्या खडकांची निर्मिती कशी होते.त्याविषयी जाणून घेऊयात. ऊन, वारा, पाऊस आणि तापमानातील सतत होणाऱ्या फरकांमुळे खडक तुटतात. अशा खडकांमध्ये पावसाचे पाणी मिसळते. पाणी झिरपल्यामुळे खडकांमधील खनिजे विरघळतात. खडकांच्या अपक्षय क्रियेमुळे खडकाचे तुकडे होतात. खडकांचा भुगा होतो. हा झालेला भुगा, खडकाचे तुकडे, माती, खडकाचे कण हे सर्व नदी, हिमनदी, ओढे नाले यांच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन सखल प्रदेशात जमा होतात. ही क्रिया वारंवार होऊन सखल प्रदेशात एकावर एक असे थर साचत जातात. अशा प्रकारे थरावर थर साठल्याने खालील थरांवर प्रचंड दाब निर्माण होतो. त्यामुळे हे थर एकसंघ होतात व त्यातून गाळाचे खडक निर्माण होतात.गाळाचे थर एकावर एक साचताना काही वेळेस या थरांमध्ये मृत प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष गाडले जातात. त्यामुळे गाळाच्या खडकांत जीवाश्म आढळतात. मृत प्राणी, वनस्पती यांचे नैसर्गिक रीतीने जतन केले गेलेले अवशेष म्हणजेच जीवाश्म होय. ते खडकांमध्ये, नदी किंवा समुद्रतळाशी पडलेल्या गाळामध्ये तयार होतात. गाळाच्या खडकांना स्तरित खडक, थराचे खडक, जलजन्य खडक असे म्हणतात. हे खडक आधीच असलेल्या तिन्ही प्रकारच्या खडकांच्या चुऱ्यापासून तयार झालेले असतात, म्हणून त्यांना कधीकधी द्वितीयक खडक असेही म्हणतात. कोळसा, नैसर्गिक वायू (खनिज इंधन वायू), खनिज तेल, चुनखडक व इतर औद्योगिक वा आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचे पदार्थ गाळाच्या खडकांतून मिळतात. प्रस्तावना खडक गाळाचे खडक/ स्तरित खडक/ थरांचे खडक/ जलजन्य रुपांतरित खडक