The Worth of Fabric. Go Back Translation in marathi views 3:2 Now I will tell you this story in Marathi ? थिरूवल्लूवर हे तमिळ संतकवी होते. त्यांची शिकवण थिरूक्कुरल या पुस्तकात दिली आहे. ते कापड विणणारे विणकर होते. ते सुंदर कापड आणि साड्या विणत आणि बाजारात विकत. ते कधीच कोणावर रागवत नसत, कोणावर ओरडत नसत, कोणाला वाईट बोलत नसत. त्याच शहरात एक श्रीमंत तरुण राहत होता. तो सर्ववेळ आपल्या मित्रांसोबत भटकत असायचा. एक दिवस त्याने ठरवले की थिरूवल्लूवर यांना राग आणून दाखवायचा. म्हणून तो तरुण थिरूवल्लूवर यांच्याकडे गेला. आणि त्यांचे एक कापड घेतले आणि त्यांना त्याची किंमत विचारली. तेव्हा त्यांनी त्याला आठ रुपये किंमत सांगितली. मग त्या श्रीमंत तरुणाने त्या कापडाचे 2 तुकडे केले. आणि पुन्हा त्याची किंमत त्यांना विचारली. तेव्हा त्यांनी त्याला शांतपणे चार रुपये म्हणून सांगितले. मग पुन्हा त्याने त्या कापडाचे आणखी दोन तुकडे केले आणि त्याची किंमत कीचारली. त्यावर थिरूवल्लूवरनी त्याला त्याची किंमत दोन रुपये सांगितली. अशाप्रकारे तो त्या कापडाचे छोटे-छोटे तुकडे करत गेला आणि थिरूवल्लूवर शांतपणे त्या कापडाची किंमत अर्धी करून सांगत गेले. शेवटी थिरूवल्लूवर त्याला म्हणाले की आता हे कापड निरुपयोगी झाले आहे. त्यामुळे मी त्याची काहीच किंमत मागणार नाही. हे सर्व ऐकून त्या श्रीमंत तरुणाला त्याची चूक कळली. त्याचे डोळे उघडले आणि त्याने त्याच्या वाईट सवयी सोडून देण्याचे ठरवले. आता मराठीत तीच गोष्ट ऐकून बरे वाटले ना ? Introduction and Explanation Activity Translation in marathi Explanation