मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये

दुसरा चंद्रगुप्त

views

3:4
समुद्रगुप्तानंतर त्याचा पुत्र दुसरा चंद्रगुप्त हा सम्राट बनला. त्याने गुप्तांचे सामाज्य वायव्येकडे वाढविले. ‘माळवा’ गुजरात’ आणि सौराष्ट्र हे प्रदेश त्याने जिकूंन घेतले. याच्या कारकिर्दीतील महत्त्वाची घटना म्हणजे त्यांची शकांवरील स्वारी होय. शक हे परकीय राज्यकर्ते होते. तरीसुद्धा त्यांनी 300 वर्ष भारतावर वर्चस्व गाजविले. या शकांचे अस्तित्व रुद्रसिंहच्या रूपाने शिल्लक होते . ते दुसऱ्या चंद्रगुप्ताने संपविले. त्यामुळे त्याला इतिहासात ‘शकारी’ म्हणून गौरविले आहे.विक्रमादित्य म्हणजे दुसरा चंद्रगुप्त हा धोरणी राजा होता . शक आणि कुराणांचा पराभव करण्यापूर्वी त्याने नाग तसेच वाकाटक या दोन राजसत्तांशी वैवाहिक संबंध जोडून आपले राज्य सूरक्षित केले. ही दोन्ही राज्ये दक्षिणे कडील बलशाली राज्ये होती. मध्य प्रदेशातील कुबेरनाग या राज्यकन्येशी त्याने स्वतः विवाह केला. तर त्याने त्याची कन्या प्रभावती ही दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाला देऊन त्याच्याशी मैत्रीचे संबंध जोडले.याच्या कारकिर्दीत भारतीय तंत्रज्ञान किती प्रगत होते ते दिल्लीजवळ असलेल्या मेहरोली या ठिकाणच्या लोखंडी खांबातून समजते.