मौर्यकालीन भारत

मौर्यकालीन राज्यव्यवस्था

views

3:55
मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र होती. प्रशासनाच्या सोयीसाठी राज्याचे चार विभाग केले होते. त्यातील प्रत्येक विभागाची वेगळी व स्वतंत्र राजधानी होती. अशोकाच्या शिलालेखांच्या अनुसार राजधान्यांची नावे पूर्वेकडील तोसली, पश्चिमेकडील उज्जयनी, दक्षिणेकडील सुवर्णनगरी व उत्तरेकडील तक्षशिला ही होती. प्रांतीय प्रशासनाचा प्रमुख हा राजपुत्र असे. तो राजाचा प्रतिनिधी म्हणून प्रांतावर राज्य करत असे. राजपुत्राला साहाय्यक म्हणून महाअमात्य व मंत्र्यांची समिती असे. प्रशासनाचा प्रमुख म्हणून सम्राट तर त्यास साहाय्य करण्यासाठी मंत्रीपरिषद असे. सर्व अधिकाऱ्यांवर व शत्रूंवर देखरेख ठेवण्यासाठी अशोकाचे सक्षम हेरखाते होते व त्याचे जाळे संपूर्ण राज्यभर पसरले होते.मौर्य साम्राज्याचे सैन्य हे त्याकाळचे सर्वांत मोठे सैन्य होते. या साम्राज्याकडे ६,००,००० पायदळ, ३०,००० घोडदळ व ९,००० लढाऊ हत्ती होते. हेरगिरीचा विभाग अंतर्गत व बाह्य सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा करत असे. अशोकाने जरी युद्ध व विस्तारास आळा घातला तरी त्याने त्याचे सैन्य शांतता व सुरक्षितता यांसाठी कायम ठेवले.