सममिती

आलेख कागदावर सममित आकृत्या काढणे

views

2:5
आलेख कागदावर सममित आकृत्या काढणे. मुलांनो या आलेख कागदावरील आकृतीचे निरीक्षण करा. रेषा L L (एल) च्या डाव्या बाजूला रेषाखंड AB काढला आहे. रेषा Lच्या डावीकडे जेवढया अंतरावर A हा बिंदू आहे तेवढ्याच अंतरावर उजवीकडे A हा बिंदू आहे. तर रेषा L च्या डावीकडे जेवढया अंतरावर B हा बिंदू आहे तेवढ्याच अंतरावर उजवीकडे “B”हा बिंदू आहे. म्हणजेच ‘A’ व ‘B’ हे बिंदू म्हणजे A व B ची प्रतिबिंबे आहेत. आपल्याला असेही म्हणता येईल की रेषाखंड AB ही आकृती रेषाखंड ‘AB’ चे प्रतिबिंब आहे . जर आपण उजवीकडील रेख AB आणि डावीकडील रेख A’B’ यांची लांबी मोजली तर आपल्याला काय दिसेल? (पाठ्यपुस्तक पान क्र. 42 पहा) वि: सर दोन्ही समान दिसतील. शि: अगदी बरोबर! रेख AB व रेख A’B’ या दोन्हींची लांबी समान असेल . शि: आता या आकृत्यांचे निरीक्षण करा. रेषा L या सममिती अक्षामुळे आकृतीचे जे दोन भाग झाले आहेत ते तंतोतंत जुळतात का ते मला सांगा? वि: सर आकृती क्र. 1, 2 आणि 4 मध्ये रेषा L या सममिती अक्षामुळे आकृतीचे दोन भाग झाले आहेत. आणि आकृती क्र. 3 व 5 मध्ये 2 समान भाग झाले नाहीत. शि: बरोबर ! आता आपण सममित आकृत्या कशा पूर्ण करायच्या ते पाहू ? या आलेख कागदावर रेषा L हा सममित अक्ष आहे. रेषा L च्या वरच्या बाजूस उजवीकडे किंवा डावीकडे जशी आकृती आहे . तशीच आकृती आपण खालील खालील बाजूस व दुसऱ्या बाजूस काढू. शि: पाहिलंत? तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या सममित आकृत्या अक्षाच्या मदतीने आलेख कागदावर काढू शकतो.