त्रिमितीय वस्तू आणि घडणी

घडणी

views

2:41
घडणी:- शि: इष्टिकाचिती: मुलांनो, मागील इयत्ते मध्ये आपण पुठठ्याच्या एका खोक्याच्या काही कडा कापून ते सपाट करून ठेवल्यास त्या खोक्याची घडण मिळते हे आपण शिकलो होतो. हस्तकलेच्या तासाला आपण कागदापासून होडी किंवा कागदाच्या वस्तू बनविण्यासाठी सपाट घोटीव कागदाला घडी घालून त्यापासून विविध आकार बनवतो. अशाच विविधघडणींचा अभ्यास आता आपल्याला करायचा आहे. त्रिमितीय आकाराच्या वस्तूंचा व्दिमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडण होय ही आकृती पहा. या मध्ये एक पुठ्ठ्याचा आराखडा दाखवला आहे. या पुठठ्याचा आराखड्यातील रेषांवर जर आपण घड्या घालून पाहिल्या तर त्यातून त्रिमितीय आकाराची वस्तू म्हणजेच खोके तयार होते. या आकारातील सर्व पृष्ठे आयतकार आहेत. अशा आकाराच्या वस्तूला इष्टिकाचिती असे म्हणतात शि: घन : मुलांनो, पहा कागदी पुठ्याची एक वेगळी घडण या आकृतीत दाखवली आहे. जर या घडणीमधील रेघांवर आपण घड्या घालून त्याच्या कडा एकमेकांना जुळवल्या तर आपल्याला त्रिमितीय आकाराचे आणखी एक वेगळे खोके तयार झालेले दिसून येते आहे. पण या खोक्याचा आकार हा चौरसाकार दिसत आहे. कारण या आकारातील सर्व पृष्ठे चौरसाकार आहेत. म्हणून अशा वस्तूंच्या आकाराला घन असे म्हणतात