चित्रलेख

प्रस्तावना

views

3:18
चित्रालेख: चौथीमध्ये आपण चित्रालेखाचा अभ्यास केला आहे. चित्रावरून आपल्याला त्या माहितीचे वर्णन करणे सोपे जाते. परिसरातील वेगवेगळ्या वस्तूंचे आपण वर्णन करत असतो. शाळेमध्ये विविध खेळ खेळत असतो. बागेत असणारी विविध फुलांची झाडे, त्यांची संख्या, वर्गातील मुले-मुली, विविध पुस्तके इत्यादींची माहिती दाखविण्यासाठी आपण काही चिन्हांचा अथवा काही चित्रांचा वापर करतो. अशा चिन्हांमुळे आपल्याला त्या माहितीचे चटकन आकलन होते. अशा प्रकारच्या चित्रांच्या माहितीच्या तक्त्यांना ‘चित्रालेख’ किंवा ‘माहितीचे चित्ररूप’ असे म्हणतात. म्हणजेच जेव्हा दिलेली माहिती चित्रांच्या स्वरुपात दर्शवितात तेव्हा त्याला चित्रालेख असे म्हणतात.इयत्ता चौथी मध्ये आपण अशा माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्याचा आपण सराव करूया.