भरती- ओहोटी Go Back लाटा views 3:31 जेव्हा वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने किंवा ऊर्जेने सागराचे पाणी गतिमान (प्रवाही) होते. आणि त्यामुळे सागरातील पाणी पुढे ढकलले जाऊन पाण्यावर तरंग निर्माण होतात. तेव्हा त्या तयार होणाऱ्या तरंगांना लाटा असे म्हणतात.वाऱ्यामुळे तयार झालेल्या या लाटांमुळे सागराचे पाणी वरखाली व किंचित मागे – पुढे होते. या लाटा त्यांच्यात सामावलेली ऊर्जा किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात व त्या उथळ किनारी भागात येऊन फुटतात. सागराच्या पृष्ठभागावर या लहानमोठ्या लाटा सतत उसळत असतात. लाटांची निर्मिती ही सुद्धा एक नैसर्गिक, नियमित होणारी घटना आहे. वाऱ्यामुळे सागरी जल उचलले जाते व त्याच्यासमोर खोलगट भाग तयार होतो. समुद्राच्या पाण्यातील लाटेचा जो उंच भाग आपल्याला दिसतो त्याला शीर्ष म्हणतात. तर लाटेचा जो खोलगट भाग दिसतो त्याला द्रोणी असे म्हणतात. लाटेचे उंच व खोलगट भाग वाऱ्यामुळे तयार होतात, कारण वाऱ्यामुळे समुद्रातील पाणी वर – खाली होते. वेगवान वारा जर एकाच दिशेने असेल तर मोठ्या लाटांची निर्मिती होते. भरती – ओहोटी केंद्रोत्सारी बलाची उदाहरणे केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल भरती ओहोटीची कारणे भरती – ओहोटीचे प्रकार भरती – ओहोटीचे परिणाम लाटा त्सुनामी