वारे Go Back चक्रीवादळे views 3:37 चक्रीवादळे – हे एक प्रकारचे विध्वंसक वादळ आहे. हे समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोलगोल फिरणाऱ्या हवेमुळे बनते. पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भगात, जपान, चीन, फिलीपाईन इत्यादी देशाच्या किनाऱ्यालगत ही वादळे निर्माण होतात. जून ते ऑक्टोबर या काळात ही निर्माण होतात व ‘टायफुन’ या नावाने ती ओळखली जातात. चक्रीवादळे असल्यामुळे अर्थातच ती वेगवान वारे आणि मुसळधार पाऊस यांमुळे विनाशकारी ठरतात. तसेच कॅरेबियन समुद्रातही ही वादळे निर्माण होतात. ही वादळे हरिकेन्स या नावाने ओळखली जातात. कमीत कमी 60 किमी ताशी असा यांचा वेग असतो. हे वारे सुद्धा विनाशकारी असतात. याशिवाय समशीतोष्ण प्रदेशातही हे आवर्त तयार होतात. परंतू त्यांची तीव्रता कमी असते. म्हणून ते विनाशकारी नसतात. जगभर येणाऱ्या विविध चक्रीवादळांना नावे देण्यात येतात. या नावांची यादी प्रत्येक महासागरासाठी तयार करण्यात येते. महासागराच्या अवती भोवती असणाऱ्या देशांनी सुचवलेल्या नावांनुसार ही यादी तयार करतात. साधारणतः वाऱ्याचा वेग 33 नॉटस म्हणजेच सुमारे 60 किमी प्रतितास किंवा त्याहून जास्त असल्यास त्या वाद्ळाना नावे देण्यात येते. सामान्यपणे लक्षात राहावे म्हणून वादळांना नावे देण्याची पद्धत आहे. प्रस्तावना हवेचा दाब वाऱ्यांचे प्रकार स्थानिक वारे खारे वारे व मतलई वारे विशेष माहिती हंगामी वारे चक्रीवादळे