शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र

प्रस्तावना

views

3:34
महाराज जन्माला येण्यापूर्वी महाराष्ट्रात काय परिस्थिती होती, या ठिकाणचे लोक कोणत्या परिस्थितीला तोंड देत होते, याची माहिती करून घेणार आहोत. मध्ययुगाचा काळ: इतिहासाचा अभ्यास तीन कालखंडात केला जातो. १)प्राचीन काळ २)मध्ययुगीन काळ आणि ३) आधुनिक काळ. प्राचीन काळ म्हणजे खूप जुना काळ. त्यानंतरचा मध्ययुगीन व अलीकडील आधुनिक काळ होय. आपले शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ म्हणजे मध्ययुगाचा काळ होय. त्याकाळी सर्वत्र राजेशाह्यांचा अंमल असे. म्हणजे राजे राज्य करत. त्यातील बरेच राजे प्रजेच्या, म्हणजेच राज्यातील लोकांच्या हिताचा विचार न करता आपल्याच चैनविलासात मग्न असत. म्हणजेच प्रजेचे प्रश्न, अडचणी न सोडवता राजे आपले खाऊन-पिऊन, ऐषारामात, मजेत राहत असत. पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले. उदा. उत्तरेतील मुघल सम्राट अकबर. मुघल घराण्यातील राजे जनतेचे हित बघत नसत. परंतु सम्राट अकबराने तो बादशाह असताना अनेक चांगली प्रजेच्या हिताची कामे केली. तसेच दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हाही प्रजेचे हित पाहत असे. कृष्णदेवराय लढाईनंतर स्वत: युद्धभूमीची पहाणी करत असे, जखमी सैनिकांच्या औषधोपचाराची व्यवस्था करत असे. तसेच मरण पावलेल्या सैन्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेत असे. या सम्राटानेही लोकांच्या उपयोगाची अनेक कामे केली.