शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र

निजामशाहा आणि आदिलशाहा

views

3:07
शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य म्हणजे स्वत:चे राज्य होय. महाराजांपूर्वी सुमारे चारशे वर्षे महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन माणसांचे राज्य नव्हते. तर महाराष्ट्रावर परकीय राजे राज्य करत होते. महाराष्ट्राच बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाहा आणि विजापूरचा आदिलशाहा या दोन सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता. ते मनाने उदार नव्हते. फक्त आपल्या फायद्याचा विचार करणारे होते. ते प्रजेवर जुलूम करत. या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते. ते एकमेकांचे कट्टर शत्रू होते. त्यांच्यात नेहमी लढाया होत. या लढायांमुळे रयतेचे हाल होत असत. लोकांच्या उभ्या पिकांची नासधूस होत असे, जनावरे व माणसे या लढाईत मृत्यूमुखी पडत असत. त्यामुळे रयत नेहमी भीतीत राहत असे. त्यांच्या राज्यातील रयत सुखी नव्हती. हे दोन सुलतान व त्याचे सैन्य धर्माच्या नावाखाली त्यांचा छळ करत असत. त्यामुळे उघडउघड उत्सव, सण साजरे करणे, पूजा करणे धोक्याचे झाले होते. रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. सुरक्षित वाटत नव्हते. सगळीकडे अन्याय होत होता.