प्राण्यांचा जीवनक्रम

प्रस्तावना

views

2:52
तुम्ही राहाता त्या परिसरात अनेक लहान- मोठे प्राणी बघत असाल. कुत्री, मांजरे, कोंबड्या यांसारखे प्राणी तुमच्या आसपास असतात. त्यांची पिल्ले तुम्ही बघता. कोंबडीचे अंडे आणि नंतर त्यातून बाहेर पडलेले पिल्लूही तुम्ही पाहिले असेल. म्हणजे या प्राण्यांचाही विशिष्ट जीवनक्रम आहे. कोंबडीचे अंडे, त्यातून बाहेर आलेले तिचे पिल्लू, नंतर त्या पिल्लाची हळूहळू होणारी वाढ हा झाला कोंबडीचा जीवनक्रम. वेगवेगळ्या प्राण्यांचा जीवनक्रम वेगवेगळा असतो. त्याची माहिती आपण या पाठात घेणार आहोत.