प्राण्यांचा जीवनक्रम

रूपांतरण

views

3:57
शेळी व शेळीच्या करडात सारखेपणा असतो. तसेच कोंबडी व कोंबडीचे पिल्लू यांच्यातही सारखेपणा असतो. म्हणजेच जशी शेळी किंवा कोंबडी असते, तशीच त्यांची पिल्ले असतात. फक्त ती आकाराने लहान असतात. परंतु फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू यांच्यात सारखेपणा दिसत नाही. त्यांच्यात खूप फरक असतो. अळी वेगळी दिसते व फुलपाखरू वेगळे दिसते. “पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपांत लक्षात घेण्याजोगी तफावत असणे, यालाच रूपांतरण असे म्हणतात.” याठिकाणी जर आपण अळी व पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू यांच्या रूपांचा विचार केला तर त्यांच्या रूपातील फरक लगेच लक्षात येतो. रूपांतर म्हणजे रूपातील अंतर किंवा फरक असे म्हणता येईल. तर या फुलपाखराच्या रूपात असा फरक का जाणवतो. ते आपण समजावून घेऊ.