पिण्याचे पाणी

प्रयोग

views

4:14
आपण मीठ, मध, धुण्याचा सोडा, तुरटीची पूड, वाळू, गव्हाचे पीठ, लाकडाचा भुसा, थोडे तेल असे पदार्थ पाण्यात टाकून बघितले. आपल्याला काय दिसले? तर साखर, मीठ, धुण्याचा सोडा, तुरटीची पूड हे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर दिसेनासे झाले. ते पदार्थ पाण्यात पूर्णपणे विरघळले. परंतु, वाळू, गव्हाचे पीठ, लाकडाचा भुसा, तेल हे पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत. मुलांनो, यावरून आपल्याला काय समजते? तर काही पदार्थ पाण्यात विरघळतात, तर काही पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत. जो पदार्थ पाण्यात विरघळतो तो पदार्थ भांड्यातील संपूर्ण पाण्यात पसरतो व त्या पाण्याला त्या पदार्थाची चव येते. उदा, मीठ पाण्यात विरघळले की भांड्यातील पाणी चवीला खारट लागते. साखर विरघळली की पाणी गोड लागते.