इतिहास आणि कालसंकल्पना

काळाची विभागणी आणि काळरेषा

views

4:05
इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला विविध कालखंडांचा अभ्यास करावा लागतो. हे विविध कालखंड समजण्यासाठी आपल्याला ‘काल’ म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. काळ समजावून घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काळ हा अखंड असतो. त्यात कधीही खंड पडत नाही. तो सतत पुढे जात असतो. तुम्ही कधी असं ऐकलं आहे का की काल दुपारी २.०० वाजता काळ थांबला होता. नाही ना? म्हणजेच काळ कधीही, कोणासाठीही थांबत नसतो. त्याचे चक्र सतत पुढे – पुढे जात असते. पण आपण आपल्या सोयीसाठी त्याचे विभाजन करतो, त्याचे भाग पडतो. काळाचे विभाजन म्हणजेच काळाचे विभाग. हे आपण कोणत्या कारणाने आणि कोणत्या प्रकारे करतो, यावर काळ जाणून घेण्याच्या पद्धती अवलंबून असतात. सूर्योदय झाला की आपण म्हणतो दिवस उजाडला, सकाळ झाली. आणि सूर्यास्त झाला की आपण म्हणतो दिवस मावळला, रात्र झाली. म्हणजेच आपण काळाचे विभाजन दिवस व रात्र या दोन भागांत करतो.