पृथ्वीवरील सजीव

प्रस्तावना, पृथ्वीची उत्पत्ती

views

4:07
सर्व सजीव व निर्जीव घटक पृथ्वीवर आढळून येतात. तसेच ह्या सर्व घटकांवर मानव अवलंबून आहे.( या पृथ्वीची निर्मिती कशी झाली असेल? पृथ्वी कशी घडली? केव्हा घडली? ती आता जशी आहे, तशीच आधीही होती का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते, की सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला, एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. त्याच्या अत्यंत वेगवान, चक्राकार गतीमुळे त्याचे तुकडे झाले. त्यातून सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. सूर्य हा एक तारा आहे. तो मोठा आणि तेजस्वी आहे. पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो. ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात, ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. पृथ्वी हा एक ग्रहच आहे. पृथ्वीशिवाय सूर्याभोवती फिरणारे आणखी सात ग्रह आहेत- १)बुध २)शुक्र ३)मंगळ ४)गुरु ५)शनी ६)युरेनस ७)नेपच्यून.