समांतर रेषा व छेदिका Go Back समांतर रेषा व छेदिका views 4:14 समांतर रेषा व छेदिका : आज आपण समांतर रेषा व छेदिका म्हणजे काय याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. पहा, माझ्याकडे या दोन काडया आहेत. या दोन काडया एकमेकांना कुठे छेदतील का? जर आपण या दोन्ही काडया उजव्या व डाव्या बाजूला वाढवल्या तरी त्या सरळ रेषेत वाढत जाणार आहेत. म्हणजेच दोन्ही काडया एकमेकांना छेदणार नाहीत यावरून आपल्या असे लक्षात येते की, एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणा-या रेषांना ‘समांतर रेषा’ असे म्हणतात. उदा. रेषा l व रेषा m या परस्परांच्या समांतर रेषा आहेत. समांतर रेषा दाखवण्यासाठी ‘II’ असे चिन्ह वापरतात. म्हणून आपण या दोन्ही रेषांचे लेखन रेषा l (एल) || (समांतर) रेषा m असे करू शकतो. समांतर रेषा व छेदिका व्युत्क्रम कोन समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोन व त्यांचे गुणधर्म रेषा व छेदिका यांच्या गुणधर्मावर आधारित उदाहरणे दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे