समांतर रेषा व छेदिका

दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे

views

3:56
दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे : मुलांनो आता आपण दिलेल्या रेषेला समांतर रेषा कशाप्रकारे काढतात, ते शिकणार आहोत.रचना १ : दिलेल्या रेषेला रेषेबाहेरील बिंदूतून गुण्याच्या साहाय्याने समांतर रेषा काढणे: मुलांनो दिलेल्या रेषेला रेषेबाहेरील बिंदूतून समांतर रेषा दोन पद्धतीने काढता येते. या दोन्ही पद्धती आपण आज पाहणार आहोत. रीत – 1) 1.सर्वप्रथम रेषा l (एल) काढा. 2) रेषा l च्या बाहेर बिंदू P घ्या. 3) आता कंपासपेटीतील जे दोन गुणे आहेत त्यांचा वापर करा. हया आकृतीमध्ये ज्यापद्धतीने दोन्ही गुण्यांची रचना केली आहे, तशा पद्धतीने हे दोन्ही गुणे एकमेकांना चिकटवा. पहा गुण्या B ची कड बिंदू P वर आहे. त्या कडेवर रेषा काढा. 4) त्या रेषेला m हे नाव द्या. 5) m ही रेषा पुढे व मागे वाढवा. पहा रेषा m ही रेषा l ला समांतर आहे.आता दुसऱ्या पदधतीने समांतर रेषा कशी काढतात ते बघूया. (page no. 13 वरील आकृती)रीत 2 – 1) रेषा l (एल) काढा. त्या रेषेच्या बाहेर कुठेही बिंदू P घ्या. 2) बिंदू P मधून रेषा l वर रेख pm हा लंब काढा. 3) नंतर रेषा l वर आणखी एक N हा वेगळा बिंदू घ्या. 4) बिंदू N मधून रेख NQ हा रेषा l ला लंब काढा. पहा रेषा NQ = रेषा MP असली पाहिजे. 5) आता बिंदू P व Q मधून जाणारी रेषा m काढा. ही रेषा l ला समांतर आहे.