माझा जिल्हा माझे राज्य

प्रस्तावना

views

4:17
आपण भारताचे नागरिक आहोत. जगात अनेक देश आहेत. त्यातील एक म्हणजे आपला भारत होय. या भारत देशात अनेक राज्ये आहेत. त्यातील एक आपले महाराष्ट्र राज्य होय. या महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्हे आहेत. त्यातील एक आपला जिल्हा होय. आपल्या जिल्ह्यात अनेक तालुके आहेत. त्यातील एक म्हणजे आपला तालुका होय. आपल्या तालुक्यात अनेक छोटी-मोठी गावे आहेत. त्यातील एक म्हणजे आपले गाव आहे. आज आपण या पाठात आपल्या जिल्ह्याची व राज्याची निर्मिती कशी होते ते पाहणार आहोत. ते समजण्यासाठी आपण झाडाचे उदाहरण घेणार आहोत. आपण झाड पाहतो, तेव्हा आपण फक्त झाड म्हणूनच त्याचा विचार करतो. परंतु हे झाड तयार होण्यासाठी पाने, लहान फांदया खोड इ. अनेक घटकांची आवश्यकता असते. अगदी असेच आपले राज्यसुद्धा तयार होण्यासाठी अनेक घटकांची गरज असते. लहान-लहान वस्त्या, गावे, तालुके व जिल्ह्यांचे मिळून राज्य तयार होते. ते कशा पद्धतीने तयार होते ते आपण नकाशाच्या साहाय्याने समजावून घेऊ.