माझा जिल्हा माझे राज्य

भाषा व भाषेच्या बोली

views

4:57
आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे रोजी झाली. भारतात विविध घटकराज्ये आहेत. या घटक राज्यांची निर्मिती भाषांच्या आधारावर झालेली आहे. उदा: गुजराती भाषा बहुसंख्येने बोलणारे लोकांचे राज्य म्हणजे गुजरात. तर कन्नड भाषा बोलणाऱ्या लोकांचे राज्य कर्नाटक. तसेच मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचे राज्य म्हणजे महाराष्ट्र ‘मराठी’ ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. भाषेचा विचार करता आपल्या राज्यात भाषेच्या बाबतीत साम्यही आहे तसेच विविधताही आहे. आपल्या राज्यात मराठी भाषेच्या उच्चारांमध्ये विविध प्रदेशानुसार बदल किंवा फरक जाणवतो. त्यामुळे आपल्या राज्यात बोलीभाषेच्या बाबतीत विविधता आढळून येते. या विविधतेचा आपण आनंदाने स्विीकार केला पाहिजे. इतरांच्या बोलीभाषेतील दोष, उणीवा, कमतरता आपण शोधत न बसता त्या भाषेतील गोडवा समजून घेतला पाहिजे. जसे- आपण शाळेत किंवा समाजात वावरत असताना प्रमाणित मराठी भाषेचा वापर करतो. म्हणजेच जशी पुस्तकातील शुध्द भाषा असते अशा भाषेचा आपण वापर करतो. परंतु आपण आपल्या कुटुंबात, नातेवाईकांमध्ये बोलीभाषेचा वापर करीत असतो. आपल्या राज्यात विविध प्रदेशात वेगवेगळ्या बोली भाषा बोलल्या जातात.