त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा

शिरोलंब

views

3:33
शिरोलंब: मुलांनो, तुम्हांला आठवतयं ना, मागील इयत्तेमध्ये आपण कोनाचे दुभाजक एकसंपाती असतात आणि त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक एकसंपाती असतात ह्या गोष्टींचा अभ्यास केला होता. त्यांच्या संपात बिंदूस अनुक्रमे अंतर्मध्य व परिमध्य म्हणतात हेही आपल्याला माहीत आहे. आता आपण शिरोलंब म्हणजे काय हे समजून घेवूया. शिरोलंब म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचे झाले तर त्रिकोणाची उंची. आता ह्या त्रिकोणाची उंची कशी काढायची?