त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा

त्रिकोणाच्या लंबसंपात बिंदूचे स्थान

views

4:59
त्रिकोणाच्या लंबसंपात बिंदूचे स्थान: मुलांनो, प्रथम कोणताही एक काटकोन त्रिकोण काढा. त्याचे सर्व शिरोलंब काढा. ते कोणत्या बिंदूत मिळतात ते पहा. ∆ABC हा काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये दोन बाजूं मध्ये 90० चा कोन तयार होतो. जर BC हा पाया घेतला तर रेख AB हाच शिरोलंब होईल. जर आपण AC हा पाया घेतला त्याच्या समोरच्या बिंदूतून म्हणजे B बिंदूतून AC वर लंब काढला तर रेख BD हा पाया AC चा शिरोलंब होईल. आणि जर पाया AB घेतला व B बिंदूपासून रेख थोडी खाली ओढली की त्याच्या समोरील C बिंदूतून आपण लंब काढू शकतो. म्हणजेच पाया AB चा बाजू BC हा शिरोलंब होईल. आणि हे तीनही शिरोलंब B या बिंदूत छेदतात. या वरून आपल्याला असे लक्षात येते की काटकोन त्रिकोणाचा लंबसंपात बिंदू हा काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर असतो.