ऐतिहासिक काळ Go Back खेळ आणि मनोरंजन views 2:52 प्रत्येकाला जीवनात थोडा तरी विरंगुळा हवा असतो. त्यासाठी आपण विविध मनोरंजनाच्या साधनांचा वापर करतो. आज आपण टीव्ही, रेडिओ वापरतो. व्हिडिओ गेम, कॉम्पुटर गेम तसेच वेगवेगळे मैदानी खेळ खेळतो. या सर्व गोष्टींतून आपले मनोरंजन होते. प्राचीन नागरी संस्कृतीमध्येही असे खेळ आणि मनोरंजनाचे विविध प्रकार होते. त्यातील एक म्हणजे प्राण्यांची शिकार व दुसरा म्हणजे दोन पैलवानांच्यातील कुस्ती हे होय. याशिवाय पट आणि सोंगट्यांचे खेळही खेळले जात. पट व फासे किंवा कवड्या हा एक जुना बैठा खेळ आहे. त्याकाळी हा खेळ सोंगट्या व फासे यांनी खेळत. प्राचीन इजिप्तमध्ये बुद्धिबळासारखा असलेला ‘सेनात’ नावाचा खेळ सोंगटया आणि पट घेऊन खेळला जात असे. तो त्याठिकाणी लोकप्रिय होता. चीन, मेसोपोटेमिया, हडप्पा या सर्व संस्कृतीमध्ये पट आणि सोंगट्यांचा खेळ लोकप्रिय होता. हडप्पा काळाच्या उत्खननात मुलांची विविध प्रकारची खेळणी मिळालेली आहेत. उदा. मातीच्या भिंग-या, शिट्टया, खुळखुळे, खेळण्यातील बैलगाड्या, दोन्ही बाजूला चाके व आडव्या काठीवर मध्ये पक्षी असे चाकांवरचे प्राणी व पक्षी यांसारख्या वस्तूंचा यात समावेश होतो. प्राचीन संस्कृतीमध्ये खेळाप्रमाणेच संगीत व नृत्य, यांनाही महत्त्व होते. कोणत्याही उत्सव किंवा आनंदाच्या प्रसंगी संगीत व नृत्याचा कार्यक्रम आयोजित करत. या कार्यक्रमात अनेक प्रकरची वाद्ये वापरात होती. त्यातील ‘बालाग’ हे तंतुवाद्य मेसोपोटेमियात वापरत असत. तसेच पूर्वी सारंगी हेही तंतुवाद्य होते. याशिवाय झांजा, खुळखुळे, बासरी, ढोल अशी अनेक प्रकरची वाद्ये वाजविली जात असत. इजिप्तमधील राजांना ‘फॅरो’ म्हणत. हे फॅरो एखाद्या उत्सवाच्या वेळेस स्वत: नृत्य करत. हडप्पा संस्कृतीत सुद्धा नृत्याला महत्त्व होते, हे त्याठिकाणी सापडलेले नृत्य करणा-या नर्तिकेच्या कांस्य मूर्तीवरून स्पष्ट होते. अशा तऱ्हेने अश्मयुगापासून सुरू झालेली मानवी संस्कृती ही विकसित नागरी संस्कृतीपर्यंत येऊन पोहचली. प्रस्तावना नद्यांच्या खोरयांमधील नागरी संस्कृती इजिप्त संस्कृती हडप्पा संस्कृती खेळ आणि मनोरंजन