नैसर्गिक आपत्ती

त्सुनामी

views

4:13
त्सुनामी : ज्यावेळी भूकंपाचा उगम समुद्रात असतो, त्यावेळी समुद्रात खूप मोठया लाटा निर्माण होतात. एक लाट तीन चार मजली इमारतीइतकी उंच असते. अशा लाटा प्रचंड वेगाने किनाऱ्यावर येऊन धडकतात. या लाटांना त्सुनामी असे म्हणतात. त्सुनामी हा जपानी भाषेतील शब्द आहे. माहीत आहे का तुम्हांला :- मुलांनो, या नैसर्गिक आपत्ती, काही सांगून येत नाहीत. तसेच या आपत्ती आपण रोखूही शकत नाही. परंतु या आपत्ती येऊन गेल्यानंतर जनजीवन विस्कळीत होते. ते पूर्वपदावर येण्यासाठी काय केले पाहिजे याचे प्रशिक्षण वर्ग असतात. मोठ्या शहरांमध्ये आणि प्रत्येक जिल्हयामध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी काय करायचे ते ठरलेले असते. आपण काय शिकलो :- मुलांनो, या पाठातून आपण पुढील गोष्टी माहीत करून घेतल्या आहेत. १) पाऊस पडण्याचा ठरावीक काळ सोडून इतर वेळी पडणाऱ्या पावसाला अवकाळी पाऊस असे म्हणतात. हा पाऊस अचानक पडतो. हे नेहमी लक्षात ठेवा : मुलांनो नैसर्गिक आपत्ती येणे किंवा न येणे हे आपल्या हातात नसते. तसेच ती रोखणेही आपल्या हातात नसते. म्हणून नैसर्गिक आपत्तींविषयी माहीती मिळवून त्या आपत्ती आल्यानंतर काय केले पाहिजे हे माहीत करून घेतले पाहिजे.