पुरंदरचा वेढा व तह

मुरारबाजीचा अतुल पराक्रम:

views

3:27
पुरंदरचा तह: मुघलांच्या पुढे महाराजांची शक्ती चालेना, युक्ती उपयोगी पडेना, आपण मुघलांच्या अफाट सैन्याशी मुकाबला करू शकणार नाही. आपण जे कमविले आहे ते सर्व गमावून बसावे लागणार आहे, तेव्हा आता काहीही न करता काही काळ आपण माघार घेणेच योग्य आहे, असा विचार करून महाराजांनी तह करण्याचे ठरविले. लोक सुखी व्हावे, म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे! आपणही हे काम हाती घ्या. मी आणि माझे माझे मावळे आपल्या पाठीशी उभे राहू’. जयसिंग धूर्त होता. आपल्या हुशारीने त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले. महाराजही या तहास तयार झाले. हा तह १६६५ साली मिर्झाराजे जयसिंग व शिवाजी महाराज यांच्यात पुरंदर गडावर झाला. म्हणून या तहास ‘पुरंदरचा तह’ असे म्हणतात. या तहात शिवरायांनी मुघलांना तेवीस किल्ले व त्या किल्ल्यांखालचा चार लक्ष होनांचा प्रदेश देण्याचे कबूल केले. पुरंदरचा तह झाला. याचवेळी, शिवरायांनी दिल्ली जवळील आग्र्यास जाऊन बादशाह औरंगजेब यांची भेट घ्यावी असे जयसिंगाने सुचवले. त्यांच्या सुरक्षिततेची हमी मिर्झाराजे जयसिंग यांनी घेतली. जयसिंगाने सुचविलेल्या गोष्टीवर महाराजांनी विचार केला. त्याने बादशाहाची गादी मिळावी म्हणून स्वत:च्या भावांना मारले होते. त्याचा पिता शहाजहान यास सुद्धा त्याने गादीसाठी नजरकैदेत ठेवले होते. त्यातच शहाजहानचा मृत्यू झाला होता. आपल्या रक्ताच्या नात्यांच्या माणसांना तो मारू शकतो, मग आपण तर त्याचे कट्टर शत्रू आहोत. तो आपल्याशी दगाफटका करणार नाही हे कशावरून? महाराजांच्या मनात अनेक शंका आल्या, पण प्रसंगाला सावधगिरीने तोंड द्यावे असे त्यांनी ठरविले. खूप विचार करून त्यांनी आग्ऱ्याला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा निर्णय मिर्झाराजे जयसिंगांना कळवला. अशा तऱ्हेने पुरंदरचा तह पार पडला आणि शिवाजी महाराज आग्र्याला जायला तयार झाले.