बादशहाच्या हातावर तुरी दिल्या

प्रस्तावना

views

4:07
मुलांनो, आजच्या आपल्या पाठाचे नाव आहे, बादशहाच्या हातावर तुरी दिल्या. हातावर तुरी देणे म्हणजे एखाद्याला चकवून निघून जाणे. तर या पाठात आपण औरंगजेब बादशाहाला महाराजांनी कसे चकविले व स्वत:ची सुटका कशी करून घेतली त्याची माहिती घेणार आहोत. मिर्झाराजे जयसिंग व शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला. त्यावेळी जयसिंगाने महाराजांना बादशहाच्या भेटीस जाण्याविषयी सांगितले. महाराजांच्या जीविताची हमी जयसिंगाने घेतली होती. महाराजांना बादशाहावर विश्वास नव्हता. पण जयसिंगाच्या शब्दावर होता, म्हणून शिवराय औरंगजेब बादशहाच्या भेटीसाठी आग्र्याला जाण्यास निघाले. . महाराज आग्र्यास निघाले. त्यांनी आपल्याबरोबर आपले नऊ वर्षाचे संभाजीराजे, काही निवडक सरदार, त्यांच्या विश्वासातील काही माणसे आणि भरपूर खजिना घेतला. महाराज थांबत, टप्पे टप्पे घेत विश्रांती घेत आग्र्यास पोहचले.