रयतेचा राजा Go Back रयतेचे रक्षण views 3:02 रयतेचे रक्षण :- महाराजांना किंवा त्यांच्या कुटुंबाला त्रास होतोय म्हणून महाराजांनी स्वराज्याचे कार्य हाती घेतले असे नव्हे, तर त्यांना रयतेची काळजी वाटत होती म्हणून त्यांनी हे कार्य हाती घेतले होते. त्यांनी नेहमीच रयतेच्या सुखाची काळजी प्रथम केली होती. शायिस्ताखान स्वराज्यावर चालून आला त्या वेळची गोष्ट. खानाची अफाट फौज लोकांची पिके तुडवत, लोकांचा छळ करत, त्यांचा मुलूख उद्धवस्त करत येऊ लागली. प्रजेवर खानाच्या फौजेकडून अत्याचार केले जात होते. प्रजा घाबरली होती. अशा परिस्थितीत जर मुघलांनी लोकांना कैद केले, तर त्याचे पाप तुम्हांला लागेल. मुलांनो, यातून शिवरायांचे आपल्या प्रजेवर मातेसारखे असलेले प्रेम दिसून येते. चांगले ते केले :- महाराज हे जुन्या परंपरा व विचार यांना महत्त्व देणारे असले, तरी त्यांनी काही जुन्या गोष्टींतील वाईट टाकून दिले आणि नवीन चांगले निर्माण करण्याचा नेहमीच प्रयत्न केला. मुलांनो, महाराजांनी राज्यकारभार सुरू करण्यापूर्वी देशमुख, देशपांडे व इनामदार यांना शेतक-यांकडून महसूल गोळा करण्याचा हक्क असे. ते शेतकऱ्यांकडून जास्तीत-जास्त महसूल गोळा करत. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे खूप हाल होत होते. हे महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी प्रथम महसूल गोळा करण्याची ही पद्धत बंद केली. सुभेदारापासून ते कमावीसदारापर्यंत म्हणजे ज्याच्याकडे संस्थानाचा किंवा राज्याचा महसूल गोळा करण्याचा मक्ता असतो अशा सर्व अधिकाऱ्यांना महाराजांनी रोख पगार देण्याची पद्धत सुरु केली. प्रस्तावना कडक शिस्त उदार धार्मिक धोरण रयतेचे रक्षण