चित्रालेख Go Back सरावासाठी उदाहरणे views 4:05 सरावासाठी उदाहरणे – उदा १) नसरीनने शिक्षक महोत्सवासाठी आणलेल्या खुर्च्यांची माहिती चित्ररूप तक्त्यात मांडली आहे. ती माहिती समजून घेऊया. (पान क्र.८४ वरील चित्र ). मुलांनो या उदाहरणात प्रमाण १ चित्र = १० खुर्च्या असे घेतले आहे. आता पाहा, पहिल्या ओळीत ५ खुर्च्यांची चित्रं आहेत म्हणून लोखंडी खुर्च्या १० x ५ = ५० झाल्या. दुसऱ्या ओळीत खुर्च्यांची ८ चित्रं काढली आहेत, म्हणून ८ x १० = ८० प्लास्टिकच्या खुर्च्या आहेत आणि तिसऱ्या ओळीत खुर्चींची २ चित्रं काढली आहेत म्हणून २ x १० = २० लाकडी खुर्च्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही चित्ररूप माहिती वाचू शकता. आता आपण सरावासाठी काही उदाहरणांचा अभ्यास करूया. प्रस्तावना सरावासाठी उदाहरणे